Swargate Bus Stand : स्वारगेट एसटी स्टँडमध्ये बलात्काराची घटना अन् आता 30 हजारांची चोरी, महिला कंडक्टरचेच पैसे लंपास!
स्वारगेट आगारात महिला कंडक्टरचे 30 हजार रुपये चोरीला गेले आहेत. तिकीट विक्रीतून जमा झालेली 30 हजार रुपयांची ही रोकड चोरण्यात आल्याचे कंटक्टरकडून सांगितले जात आहे. नेमंक काय घडल?
पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेमुळे केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात संतापाचं वातावरण पसरलं आहे. स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करून नराधम फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची 13 पथकं तैनात करण्यात आली आहेत. या घटनेनंतर खळबळ माजलेली असतानाच त्याच स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात आणखी एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. स्वारगेट आगारात महिला कंडक्टरचे 30 हजार रुपये चोरीला गेले आहेत. तिकीट विक्रीतून जमा झालेली 30 हजार रुपयांची ही रोकड चोरण्यात आल्याचे कंटक्टरकडून सांगितले जात आहे.
नेमकं काय घडलं?
कोरेगाव डेपोच्या महिला कंडक्टर साताऱ्यावरून स्वारगेटला लालपरी घेऊन ड्युटीला आले होते. दरम्यान, स्वारगेटवरून परत जाण्यापूर्वी या महिला कंडक्टर फ्रेश होण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. मात्र परत आल्यावर पाहिले असता त्यांची पैशांची बॅगच चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्वारगेट स्थानकात बस आल्यानंतर या महिला कंडक्टर खाली उतरल्या. त्यावेळी लालपरी असलेल्या बसमधील सर्व प्रवासीही खाली उतरले होते. मात्र 3-4 प्रवासी बसमध्ये होते. त्याच्यापैकीच कोणीतरी पैशांची ती बॅग चोरी केली असल्याचा संशय त्या महिला कंडक्टरने व्यक्त केला आहे.. यासंदर्भात कोरेगाव डेपोमध्ये तक्रार नोंदवणार असल्याची माहिती या महिला वाहकांने दिली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

