MSRTC ST Employees Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मोठी अपडेट; मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, कुठे काय परिस्थिती?

MSRTC ST Employees Strike : राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर असल्याने लालपरीची चाकं थांबली आहे. संपाची हाक दिल्याने बसेस या आगारातच उभ्या आहेत. मुंबई, कल्याण, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, गुहागर, छत्रपती संभाजीनगर या बस स्थानकात काय परिस्थिती आहे, बघा व्हिडीओ....

MSRTC ST Employees Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मोठी अपडेट; मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, कुठे काय परिस्थिती?
| Updated on: Sep 03, 2024 | 12:36 PM

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या संध्याकाळी सात वाजता बैठक घेणार आहे. कामगार संघटनांच्या कृती समितीची एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर उद्या बैठक होणार आहे. तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात एसटी प्रवाशांची कोणतीही गैरसोय होईल, अशी कृती करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने राज्यभरातील चाकरमान्यांसह एसटी प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसताय. तर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसह आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशारा देत राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. दरम्यान, राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर असल्याने लालपरीची चाकं थांबली आहे. संपाची हाक दिल्याने बसेस या आगारातच उभ्या आहेत. मुंबई, कल्याण, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, गुहागर, छत्रपती संभाजीनगर या बस स्थानकात काय परिस्थिती आहे, बघा व्हिडीओ….

Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.