Afghanistan Kabul Airport | काबूल विमान तळावर नेमकं काय घडलं ?

तालिबानने काबूल विमानतळावरुन काही प्रवाशांचं अपहरण केल्याचं वृत्त अफगाणिस्तानातील मीडियाने दिलं होते. या वृत्ताबाबत नेमकी माहिती आता समोर आली असून हे प्रकरण स्पष्ट झालं आहे.

तालिबानने काबूल विमानतळावरुन काही प्रवाशांचं अपहरण केल्याचं वृत्त अफगाणिस्तानातील मीडियाने दिलं होते. यामध्ये काही भारतीयांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत होतं. ANI ने याबाबतचं वृत्त देखील दिले होते. मात्र आता याबाबतची नेमकी माहिती समोर आली असून कोणत्याही भारतीयाचं अपहरण झालं नसल्याचं समोर आलं आहे.

सर्व 150 भारतीयाचे पासपोर्ट हे केवळ चौकशीसाठी घेतले असल्याचं अफगाणिस्तानमधील एका जेष्ट पत्रकाराने स्पष्ट केलं आहे. तसेच तालिबानचा प्रवक्ता अहमद उल्ला वसेक याने देखील कोणत्याही भारतीय नागरिकाचं अपहरण झालं नसल्याचं अधिकृतरित्या स्पष्ट केलं आहे. त्याने सर्व नागरिक सुखरुप असल्याचंही सांगितलं आहे. या बातमीमुळे भारतीय नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच ज्या भारतीयांचे नागरिक अफगाणिस्तानमधून भारताकडे परतत होते त्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI