Mumbai Beaches on High Alert: पुढचे 4 दिवस मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर जाताय? जरा जपून, BMC अन् पोलिसांकडून महत्त्वाच्या सूचना
मुंबईत 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत समुद्राला मोठी भरती येणार असून, 4 डिसेंबरच्या मध्यरात्री 5 मीटर उंचीच्या लाटा अपेक्षित आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे जमणाऱ्या अनुयायांनी आणि मुंबईकरांनी समुद्रकिनाऱ्यांवर फिरणे टाळावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (6 डिसेंबर) महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदानावर दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेने 4 ते 7 डिसेंबर या कालावधीसाठी समुद्रातील भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या काळात मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर समुद्राला मोठी भरती येणार असून, 4 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजता 5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने अनुयायांना आणि मुंबईकरांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. समुद्रकिनाऱ्यांवर जाणे किंवा समुद्रात उतरणे टाळावे, तसेच विनाकारण किनारी फिरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 5, 6 आणि 7 डिसेंबर रोजी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वेगवेगळ्या वेळी भरती असणार आहे. त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन मुंबई पोलीस आणि पालिकेकडून करण्यात आले आहे.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

