आदित्य ठाकरे यांनी लवकरात लवकर लग्न करावं; शिवसेनेच्या नेत्याचा सल्ला
Aditya Thackeray Marriage Advice : शिवसेना ठाकरेगटाचे युवा नेते, आमदार आदित्य ठाकरे यांना शिवसेनेच्या नेत्याकडून लग्न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कुणी दिलाय हा सल्ला? पाहा...
मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे युवा नेते, वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना लग्न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते भरतशेठ गोगावले यांनी आदित्य ठाकरेंना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. “आदित्य ठाकरे काहीही बोलू शकतात. जोपर्यंत त्यांचे दोन ते चार हात होत नाही तोपर्यंत त्यांची विधानांना आम्ही गंभीर्याने घेणार नाही. त्यांना एवढाच सल्ला द्यायचाय की त्यांनी लवकरात लवकर लग्न करावं”, असं असं भरतशेठ गोगावले म्हणाले आहेत. भरतशेठ गोगावले यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतेय. गोगावले यांच्या या सल्ल्याला आदित्य ठाकरे काय उत्तर देणार, हे पाहणं महत्वाचं असेल.
Published on: Mar 14, 2023 01:10 PM
Latest Videos
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?

