भुलेश्वरमधील गणेश मुर्ती अपघात प्रकरणी खळबळ जनक माहिती समोर, अचानक मुर्तीचा…
मुंबईतील भुलेश्वर येथे आगमनावेळी 22 फुटी गणेश मूर्ती कोसळली. या दुर्घटनेत संकेत नवशे (33) आणि ब्रिजेश जोशी (30) या दोघांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले असून, त्यात पाच आणि सात वर्षांच्या दोन चिमुकलींचा समावेश आहे. तोल गेल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींवर जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईतील भुलेश्वर येथे आगमनावेळी घडलेल्या एका भीषण दुर्घटनेत 22 फुटी गणेश मूर्ती कोसळली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन भक्तांचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 33 वर्षीय संकेत नवशे आणि 30 वर्षीय ब्रिजेश जोशी यांचा समावेश आहे.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जखमींमध्ये पाच आणि सात वर्षांच्या दोन लहान मुलींचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. सर्व जखमींवर सध्या जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही गणेश मूर्ती भायखळ्याहून भुलेश्वरला आणली जात होती. त्याचवेळी, मूर्तीचा तोल गेल्याने ती अचानक कोसळली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
ही दुर्घटना मंडपाच्या अगदी 50 ते 60 मीटर अंतरावरच घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वीच घडलेल्या या घटनेने भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, अधिक तपास सुरू आहे. अशा घटना टाळण्यासाठी गणेश मंडळांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Published on: Aug 23, 2026 09:31 AM
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...

