मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी वीस हजारांच्या पुढे पोहोचली होती, मात्र आता ती गेल्या काही मागील काही दिवसात सातत्याने घटताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला आहे. 20 हजारावरून कोरोना रुग्णांचा आकडा घसरून 7 हजारांवर आला आहे. मुंबईत गेल्या चोवीस तासात 7 हजार 895 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत आज 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आज 21 हजार 25 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, त्यामुळे मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटे मुंबई पॅटर्नची जगभर चर्चा झाली होती, येत्या काही दिवसातही मुंबईकरांनी नियमांचे पालन केल्यास लवकरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही मुंबई पॅटर्न प्रभावी ठरल्याचे दिसून येईल.