Goregaon Building Fire : जीव वाचावा म्हणून धडपड, लोकांनी थेट खिडक्यांमधून मारल्या उड्या अन्… बघा VIDEO
गोरेगावमधील शालीमार इमारतीत सकाळी 9 वाजता आग लागली. मीटर बॉक्समध्ये आग लागल्याने काही रहिवाशांनी खिडक्यांमधून उडी मारून जीव वाचवला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आगीवर लवकरच नियंत्रण मिळवण्यात आले.
मुंबईमधील गोरेगाव येथील शालीमार इमारतीत आज सकाळी 9 वाजता आग लागल्याची घटना घडली. ही आग मीटर बॉक्समध्ये लागल्याची माहिती समोर येतेय. मीटर बॉक्समध्ये लागलेल्या आगीमुळे रहिवाशांना चांगलीच धडकी भरली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काही रहिवाशांना घाबरून खिडक्या आणि गॅलरीमधून उडी मारावी लागली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अधिकृत माहितीही समोर आली नाही. स्थानिक अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या आगीत कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
Published on: Sep 10, 2025 05:50 PM
Latest Videos
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

