kabutar khana : कबुतरखान्यांवरील बंदीवर ‘जैसे थे’च निर्णय, न्यायालयात सुनावणीदरम्यान काय काय घडलं? मुंबईत ‘या’ ठिकाणी कबुतरांना नवी जागा?
कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या श्वसनाचे आजार आणि इतर आरोग्य समस्या लक्षात घेता, मानवी आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. यामुळे, आता या प्रकरणात पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही सवलत मिळणार नाही.
मुंबईतील दादरसह इतक ठिकाणावरचे कबुतरखाने बंद मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेत. कबुतरखाने बंद करण्याचं प्रकरण कोर्टात पोहोचल्यानंतर कबुतरखान्यांवरील बंदीसंदर्भात कोर्टाकडून एक मोठा निर्णय देण्यात आला आहे. कोर्टाने कबुतरखान्यांवरील बंदीवर जैसे थेचा निर्णय ठेवला असून तूर्तास कबुतरखान्यांवरील बंदीही कायम राहणार आहे. तर नागरिकांची भूमिका विचारात घेता निर्णय घ्यावा, असे निर्देशही कोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. आज याच प्रकरणावर हायकोर्टात पुन्हा सुनावणी झाली.
दरम्यान, हायकोर्टाने मुंबई महापालिकेला निर्देश देत सार्वजनिक नोटीस जारी करून नागरिकांची मत जाणून घेण्यास सांगितले आहे. मुंबई महापालिकेने (BMC) कोर्टाकडे संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत कबुतरांना खाद्य देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, कोर्टाने ही मागणी फेटाळून लावत आपला आधीचा निर्णय कायम ठेवला आहे. याचाच अर्थ, सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे घालण्यावर पूर्णपणे बंदी असेल. दुसरीकडे मुंबईतील कबुतरखाने बंदी करण्याचा निर्णय होत असताना महालक्ष्मी रेसकोर्सवर कबुतरांना जागा द्या, असे काही वकिलांनी आपले मत व्यक्त केले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

