Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागच्या राजाचं राजपण… आजपण, उद्यापण; विसर्जन मार्ग रांगोळ्यांनी सजला
लालबागच्या राजाचं 2025चं विसर्जन अतिशय भक्तीमय वातावरणात होतंय. विसर्जन मार्गावर विशेष रांगोळी काढण्यात आली होती. ढोल-ताशा, आरती आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात हा सोहळा पार पडतोय
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली असून मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात दिसतोय. मुंबईतील विसर्जन मार्गावर भक्तीमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं असून भक्तांनी प्रत्येक रस्ता फुलला आहे. राजाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाल्यानंतर विसर्जन मार्गावर विशेष रांगोळी काढण्यात आली होती. रांगोळीमध्ये “राजाचं राजपण कालपण, आजपण, उद्यापण …” असा आशय लिहिण्यात आल्याचे दिसून आले. विसर्जन सोहळ्यासाठी निघालेल्या राज्याच्या मिरवणुकीत भक्तांकडून ढोल-ताशा आणि जयघोष करून राजाला निरोप दिला जात आहे. मुंबईत सकाळपासून पाऊस असूनही, भक्तांच्या उत्साहात कोणतीही कमी भासत नाही. लालबागचा राजा मंडळाचं यंदा 59 व्या वर्ष असून मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी झाली आहे. विविध माळा लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात येत आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

