Vijay Wadettiwar | लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना लोकल पास, प्रवासासाठी अडचण नाही : वडेट्टीवार

सर्वांसाठी सरसकट लोक सुरु केल्यास डब्यात एखादी व्यक्ती बाधीत असेल तर सर्वांना संसर्ग होण्याची भीती आहे. 100 टक्के लसीकरण व्हावे म्हणून लोकलमध्ये कोरोना लसीच्या दोन्ही डोसची अट ठेवण्यात आली आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे सावध पावलं उचलत मुख्यमंत्र्यांनी लोकलबाबत निर्णय घेतल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच मुंबई लोकलमध्ये प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सर्वांसाठी सरसकट लोक सुरु केल्यास डब्यात एखादी व्यक्ती बाधीत असेल तर सर्वांना संसर्ग होण्याची भीती आहे. 100 टक्के लसीकरण व्हावे म्हणून लोकलमध्ये कोरोना लसीच्या दोन्ही डोसची अट ठेवण्यात आली आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे सावध पावलं उचलत मुख्यमंत्र्यांनी लोकलबाबत निर्णय घेतल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.

राज्य सरकारनं लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी दिवाळी भेट दिली आहे. लसवंतांना एक दिवसासाठी लोकल प्रवासाचं तिकीट द्यावं,असं पत्र राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनानाला पत्र लिहिलं आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवस झालेल्या नागरिकांना प्रवासासाठी तिकीट देण्यात यावं असं पत्र राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनाला दिले आहे.

गेल्या तीन चार दिवसांपूर्वी रेल्वे प्रवाशांसाटी सिझन तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांना रोजच्या प्रवासासाठी तिकीट न देण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला होता.त्यामुळे रेल्वे स्टेशनवर वाद होत होते. आता राज्य सरकारनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना किंवा इतरांनाही एका दिवसाच्या प्रवासाचं तिकीट देण्यात यावं यासाठी पत्र लिहिलं आहे. याशिवाय कोरोना लस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींना लोकल प्रवासाचं तिकीट द्यावं. रेल्वे प्रशासनानं यासंदर्भातील खात्री करावी आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असं पत्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं रेल्वेला दिलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI