Mumbai Local : ‘या’ स्थानकादरम्यानचा प्रवास सर्वाधिक धोक्याचा, कोणत्या टप्प्यात लोकलमधून पडून होतो प्रवाशांचा मृत्यू?
लोकलच्या दरवाज्यात लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासले गेले. त्यामुळे दारत असलेले प्रवासी खाली पडले आणि सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
डोंबिवली ते ठाणे हा प्रवास सर्वाधिक धोक्याचा असल्याचं कळतंय मुंबईतील उपनगरीय लोकलवर सर्वाधिक अपघात डोंबिवली ते ठाणे स्थानकांदरम्यान होतात. सकाळच्या वेळी लोकलमधून पडल्यामुळे मृत्यू होण्याची सर्वाधिक संख्या याच टप्प्यात आहे. सकाळच्या वेळी डोंबिवली ते ठाणे या स्थानकांदरम्यान मोठी गर्दी असते, त्यामुळे लटकून प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा अधिक आहे. डोंबिवली नंतर दिवा, मुंब्रा, कळवा या स्थानकात देखील सकाळी मोठी गर्दी असते.
कल्याण, डोंबिवलीकडून चढून दरवाजा अडवणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. दरवाजा अडवणाऱ्या प्रवाशांमुळे दिवा, मुंब्रा आणि कळव्यातील प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नाही. दरवाजा अडवणाऱ्या या प्रवाशांमुळे दिवा, मुंब्रा आणि कळव्यातील प्रवाशांना अक्षरशः लटकून प्रवास करावा लागतो. कोपर, दिवा, मुंब्रा येथून लटकून प्रवास करणारे प्रवासी अनेकदा लोकलमधून खाली पडत असल्याची नोंदही झाली आहे. गर्दी कमी करण्यासाठी डोंबिवलीतून सुटणाऱ्या लोकलची संख्या आता वाढवण्याची मागणी होते आहे. दिव्यात सर्वच जलद लोकलला थांबा देण्याची मागणी सुद्धा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

