AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Train Accident : मुंब्र्यात दोन्ही लोकलला लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले, 6 जणांचा मृत्यू, GRP कर्मचाऱ्याचा गेला जीव

Mumbai Train Accident : मुंब्र्यात दोन्ही लोकलला लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले, 6 जणांचा मृत्यू, GRP कर्मचाऱ्याचा गेला जीव

| Updated on: Jun 09, 2025 | 1:36 PM
Share

कसारा ते सीएसएमटी लोकलमधून पडून 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.

कसारा रेल्वे स्थानकाकडून मुंबईच्या दिशेकडे जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी लोकलच्या दारात लटकत होते. लोकलच्या दरवाज्यात लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासले गेले. त्यामुळे दारत असलेले प्रवासी खाली पडले आणि सहा ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. यातील काही गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर धक्कादायक म्हणजे या सहा ते आठ जणांमध्ये जीआरपी कर्मचारी विकी बाबासाहेब मुख्यालय यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

कसाऱ्याहून सीएसएमटीकडे आणि सीएसएमटीकडून कसाऱ्याकडे धावणाऱ्या अशा 2 वेगवान लोकल रेल्वे एका वळणावर एकमेकांच्या शेजारून जात होत्या. यावेळी दोन्ही लोकलमधले लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले. त्यानंतर हे प्रवाशी दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या मध्ये असलेल्या जागेत पडले. तब्बल 13 प्रवासी यावेळी खाली पडले यात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

Published on: Jun 09, 2025 01:34 PM