राणे बंधूंमध्ये जुंपली, निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री… नितेश राणे नेमकं काय म्हणाले? कशावरून वाद पेटला?
महायुतीमध्ये असणारे राणे बंधू आता आपसात भिडल्याचे पाहायला मिळत आहे. धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरून राणे बंधू आपापसात भिडले.
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवरून वाद सुरूये. भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटलांच्या तक्रारीनंतर काही कामांना स्थगिती देण्यात आलीये. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटलाय. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. धाराशिव जिल्ह्यात 2029 ला सर्व खासदार आणि आमदार भाजपचेच आले पाहिजेत, असं भाजप कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे यांनी म्हटलं. त्यानंतर यावर नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत नितेश राणेंनी जपून बोलावं असा सल्ला दिल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र नितेश राणेंना सल्ला देणारं ट्वीट निलेश राणेंनी डिलीट केल्याचे समोर आले आह. मात्र यावर निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात, असं नितेश राणे म्हणालेत. बघा दोन्ही राणे बंधूंमध्ये जुंपली.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

