Pankaja Munde : ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला… उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीवर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच राजकीय वर्तुळातील नेते मंडळींकडून प्रतिक्रिया समोर येत आहे.
ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही, असं भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष आहे देशात आणि राज्यात आमचं सरकार आहे. त्यामुळे भाजपला अडचण येईल असं मला वाटत नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या प्रश्नावर तुळजापुरात हे विधान केलंय.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून पत्रकारांनी सवाल केला असता पंकजा मुंडे म्हणाल्या, ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही. भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. देशात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता आहे तर राज्यातही भाजपचे सरकार आहे. ते दोघेही मोठे नेते काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विचार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मुंबई महानगरपालिकेत भाजपला अडचण येईल का? अशी विचारणा केली असता तुळजापूर दौऱ्यावर असलेल्या पंकजा मुंडे यांनी हे विधान केलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

