Mumbai Railway Megablock | मुंबईकरांनो… आज रेल्वेनं बाहेर जाताय? बघा कसा असेल तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
आज कुठं बाहेर जायचा प्लान करताय. त्यातही तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा. कारण आज भारतीय रेल्वे मर्गिकेचे काम सुरू असल्याने रविवार तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. माटुंगा ते भायखळा रात्रकालीन आणि कुर्ला ते वाशीदरम्यान रविवारी दिवसा मध्य रेल्वेचा ब्लॉक
मुंबई, ५ नोव्हेंबर २०२३ | मुंबईकरांनो आज कुठं बाहेर जायचा प्लान करताय. त्यातही तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा. कारण आज भारतीय रेल्वे मर्गिकेचे काम सुरू असल्याने रविवार तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. माटुंगा ते भायखळा रात्रकालीन आणि कुर्ला ते वाशीदरम्यान रविवारी दिवसा मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेच्या कामांमुळे रविवारी ११० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. या लोकल फेऱ्या रद्द केल्याने रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर खार- गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी सुरु असलेल्या ब्लॉकचा आज रविवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज ११० लोकल फेऱ्या रद्द असणार आहे. मात्र, सोमवारपासून पश्चिम रेल्वे मार्गावर नियमित धावणार आहे. लवकरच सहावी मार्गिका प्रवासी सेवेत येणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग

