Mumbai Local : मुंबईकरांनो आज मेगाब्लॉक, वेळेत किती बदल? मार्ग बदलणार? जाणून घ्या…
मेगाब्लाॉक असल्याने गाड्या 10 मिनिटं उशिरा पोहचण्याची शक्यता आहे. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी-कुर्ला आणि वांद्रे हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल. या काळात कुर्ला ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील.
मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी बातमी. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (Mumbai) येथून आज सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद, अर्ध जलद लोकस (Local) सेवा ठाणे (Thane) आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील. मेगाब्लाॉक असल्याने गाड्या 10 मिनिटं उशिरा पोहचण्याची शक्यता आहे. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी-कुर्ला आणि वांद्रे हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल. या काळात कुर्ला ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. मध्य रेल्वेवर आज ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 या वेळेत सर्व फास्ट लोकल या स्लो लाईनवरून धावतील. यामुळे लोकल वाहतून 10 मिनिटं विलंबानं होण्याची शक्यता आहे.
Published on: Jul 17, 2022 10:19 AM
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी

