AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त, नेमकं झालं काय?

मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त, नेमकं झालं काय?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: May 13, 2024 | 6:11 PM
Share

मध्य रेल्वेवरील लोकल सेवा ठप्प झाल्याने रेल्वे स्थानकात ट्रेन पोहचण्यापूर्वी तासभर लोकल एकाच जागी थांबली. त्यामुळे प्रवाशांना पायी चालत आपले स्थानक गाठावे लागले. तर तासाभरानंतर लोकल सेवा सुरू झाल्याची माहिती मिळते. यासंपूर्ण प्रकारामुळे प्रवासी संतप्त झाले होते.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. मध्य रेल्वेवरील लोकल सेवा ठप्प झाल्याने रेल्वे स्थानकात ट्रेन पोहचण्यापूर्वी तासभर लोकल एकाच जागी थांबली. त्यामुळे प्रवाशांना पायी चालत आपले स्थानक गाठावे लागले. तर तासाभरानंतर लोकल सेवा सुरू झाल्याची माहिती मिळते. यासंपूर्ण प्रकारामुळे प्रवासी संतप्त झाले होते. सिग्नल बिघाडामुळे ठाणे ते कळवा स्थानकांदरम्यान तासाभराहून अधिक गाड्या खोळंबल्याने लोकल ट्रेन सेवा विस्कळीत होती. ठाणे रेल्वे स्थानकावर रेल्वे सिग्नल आणि पॅनल यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.२५ वाजता घडली. या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे दिवा-मुलुंड मार्गावर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या तर रेल्वे स्थानकावर अनेक ठिकाणी प्रवासी ताटकळत होते. यामुळे कल्याणवरून कुर्ल्याला जाणाऱ्या लोकल या उशिराने सुरू आहेत.

Published on: May 13, 2024 12:19 PM
Follow Us