मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकात किरकोळ वादातून एनएम कॉलेजचे प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या करण्यात आली आहे. ओमकार शिंदे या आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला करून पळ काढला होता. घटनेनंतर काही तासांतच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ओमकार शिंदेला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकात एका धक्कादायक घटनेत एनएम कॉलेजचे प्राध्यापक आलोक सिंग यांची किरकोळ वादातून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. रेल्वेतून उतरण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले आणि आरोपी ओमकार शिंदेने प्राध्यापक आलोक सिंग यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेमुळे मालाड रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नशेत होता. घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी ओमकार शिंदेला बेड्या ठोकल्या. मालाड येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर हा प्रकार घडला. सध्या पोलीस आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. या घटनेमुळे मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर

