शाब्बास रे पठ्ठ्या! लोकल ट्रेनमध्येच महिलेचं बाळंतपण; तरुणाने दाखवल धाडस अन्
मुंबईतील राम मंदिर स्थानकावर एका महिला प्रवाशाची प्रसूती व्हिडिओ कॉलच्या मदतीने यशस्वी झाली. प्रवासी विकास बेडरे यांनी डॉक्टर मैत्रीण देविका देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे महत्त्वपूर्ण कार्य केले. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. या कार्यासाठी दोघांचेही कौतुक होत आहे.
मुंबईच्या राम मंदिर स्थानकावर एका महिला प्रवाशानं रात्रीच्या वेळी लोकल ट्रेनमध्ये मुलाला जन्म दिला. लोकल प्रवासादरम्यान महिलेची तब्येत अचानक बिघडली. यावेळी प्रवासी विकास बेडरे यांनी प्रसंगावधान राखत ट्रेनची साखळी ओढून ती थांबवली आणि वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीचा वेळ आणि स्थानकावर सुविधांची कमतरता यामुळे तातडीने मदत मिळाली नाही.
अशा स्थितीत, बेडरे यांनी त्यांची डॉक्टर मैत्रीण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. डॉ. देशमुख यांच्या ऑनलाइन मार्गदर्शनाखाली विकास बेडरे यांनी धैर्य दाखवत महिलेची प्रसूती यशस्वीपणे पार पाडली. या घटनेनंतर आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती आहे. विकास बेडरे आणि डॉ. देविका देशमुख यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ही घटना माणुसकी आणि तत्परतेचं एक उत्तम उदाहरण ठरली आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

