BMC चा मोठा निर्णय, 127 वर्ष जुने पूल पाडणार, 12 नवे पूल उभारणार
मुंबई महापालिका प्रशासनाने 127 वर्षे जुने पूल पाडत त्या जागी केबल आधारित पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिका प्रशासन तब्बल 1775 कोटी रुपये खर्च करणार असून पुलांचे बांधकाम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि रेल्वे करणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.
मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार आहे. 1775 कोटी रुपये खर्च करत महापालिका 12 पूल केबल आधारित उभारणार आहे. 2025 पर्यंत काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. अरुंद रस्ते, वाढती वाहनांची संख्या त्यात धोकादायक पूल यामुळे दिवसेंदिवस मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने 127 वर्षे जुने पूल पाडत त्या जागी केबल आधारित पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिका प्रशासन तब्बल 1775 कोटी रुपये खर्च करणार असून पुलांचे बांधकाम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि रेल्वे करणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. दरम्यान, या पुलांचे काम 2022 पासून टप्याटप्याने सुरु करण्यात येणार असून 2025 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

