महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी ‘ही’ बाब प्रशासनाच्या लक्षात आली नाही का?; राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on Maharashtra Bhushan Award Ceremony 2022 : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 12 श्रीसदस्यांचा मृत्यू; राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया. पाहा व्हीडिओ...
मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आलेल्या 12 श्रीसेवकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काल ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री भक्तांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सहभागी आहे”, अशी फेसबुक पोस्ट राज ठाकरे यांनी लिहीली आहे.
Published on: Apr 17, 2023 12:58 PM
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
