मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटी मागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदी नेमणूक होण्यापूर्वी विवेक फणसाळकर महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे संचालक होते. विवेक फणसाळकरांनी काही वेळा आधी शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर आता चर्चांना उधाण आलं आहे. मात्र ही भेट नेमकी कशासाठी घेण्यात आली त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.