Breaking | मनसे साजरा करणार नारळी पौर्णिमा सण, कार्यक्रमापुर्वी पोलिसांकडून नोटीस
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवून कोणताही कार्यक्रम करण्यास बंदी आहे. तरीही मनसेकडून दादरमध्ये नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबईत सध्या सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोक जमण्यास बंदी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण पोलिसांनी मनसैनिकांना 149 ची नोटीस बजावली आहे. मात्र, मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्याचा चंग बांधला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवून कोणताही कार्यक्रम करण्यास बंदी आहे. तरीही मनसेकडून दादरमध्ये नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबईत सध्या सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोक जमण्यास बंदी आहे. मनसेच्या या कार्यक्रमालाही गर्दी होऊ शकते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मनसेचे शाखा अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या आहेत. यानंतरही मनसेचे कार्यकर्ते नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम जोशात साजरा करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आज दादर परिसरात मनसे आणि पोलीस आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं

