मुंबईमध्ये नुस्ता धुव्वाssss, फटाक्यांच्या आवाजानं रस्त्यावरचे कुत्रे-पक्षी गायब
एका दिवसांत मुंबईकरांनी १५० कोटी रूपयांच्या फटाक्यांचा धूर केल्याची माहिती समोर आली आहे. रात्री मुंबईत सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळाले. नियमाप्रमाणे ७ ते १० वाजेपर्यंत फटाके फोडण्याची वेळ आहे. मात्र मुंबईत रात्री दोन वाजेपर्यंत फटाके फोडत असल्याचे निदर्शनास आले.
मुंबई, १४ नोव्हेंबर २०२३ | मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. त्यातच आता फटाक्यांच्या धुराने गेल्या दोन दिवसांपासून भटके कुत्रे आणि पक्षी देखील गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईच्या हवेची गुणवत्ता २८८ इतकी नोंदविली गेली आहे. ही हवा इतकी घातक आहे की, आपण श्वास घेतोय की सिगारेट ओढतोय? या एका दिवसांत मुंबईकरांनी १५० कोटी रूपयांच्या फटाक्यांचा धूर केल्याची माहिती समोर आली आहे. रात्री मुंबईत सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळाले. हवेतील प्रदूषण हे AQI म्हणजे एअर क्वॉलिटी इंडेक्सने मोजले जाते. नियमाप्रमाणे ७ ते १० वाजेपर्यंत फटाके फोडण्याची वेळ आहे. मात्र मुंबईत रात्री दोन वाजेपर्यंत फटाके फोडत असल्याचे निदर्शनास आले. मध्यंतरी झालेल्या पावसाने मुंबईची हवा सुधारली होती. मात्र गेल्या काही दिवसांत बांधकामांची झालेली वाढ आणि आता फटाक्यांच्या धुरामुळे झालेल्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवा आता विषारी बनली आहे.