हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या ‘या’ भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड अन्…
मुंबईतील प्रभादेवी परिसरात हा खड्डा पडला आहे. तोच रस्ता सिद्धीविनायक मंदिराकडे जातो. सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरु असल्याने या काळात मोठ्या प्रमाणात भाविक सिद्धीविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र आता या रस्त्याला खड्डा पडल्याने मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.
मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाचं वातावरण बघायला मिळत आहे. राज्यातील काही ठिकाणच्या रस्त्यांची परिस्थिती बघता बाप्पाचं आगमन खड्ड्यांच्या रस्त्यातूनच झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच मुंबईच्या प्रभादेवी भागातील रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. इतकंच नाहीतर प्रभादेवी जंक्शन येथे रस्ता खचला आणि मोठा खड्डा पडल्याने या भल्या मोठ्या भगदाडात कार अडकली आहे. प्रभादेवी या परिसरात नेहमी मोठी वाहतूक सुरू असते. हा वर्दळीचा रस्ता आहे. याच रस्त्यावरून जात असताना एक कार या खड्यात अडकून पडली आहे. या कारचं पुढचं टायर या खड्ड्यात अडकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच या रस्त्यावर मोठा खड्डा पडलाय हे समजताच आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी तो पाहण्यासाठी गर्दी केली आणि एकच गदारोळ उडाला. तर घडलेल्या या घटनेमुळे रस्ते बांधकामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

