AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात

मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात

| Updated on: Sep 08, 2026 | 4:39 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. बीकेसी येथील कार्यक्रमास्थळी बनावट पीएमओ ओळखपत्रासह रोहन पारेख नावाच्या व्यक्तीला अंगरक्षकासह ताब्यात घेतले आहे. अंगरक्षकाकडे परवानाधारक बंदूकही आढळली आहे. मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, प्रवेशामागील उद्देश शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत घुसखोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील बीकेसी येथे आयोजित निता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधील कार्यक्रमाच्या ठिकाणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये २४ वर्षीय रोहन पारेख याने स्वतःला पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) अधिकारी असल्याचे भासवले होते. त्याच्याकडून पीएमओ कार्यालयाचे बनावट ओळखपत्र आढळले.

सुरक्षा तपासणीदरम्यान ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई केली. रोहन पारेखसोबत असलेल्या अंगरक्षकाकडे परवानाधारक बंदूकही आढळली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता मुंबई क्राईम ब्रांच करत आहे. बनावट ओळखपत्र आणि शस्त्रासह कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यामागे नेमका काय उद्देश होता, याचा शोध घेतला जात आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेला भेदण्याचा प्रयत्न झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कसून चौकशी सुरू आहे.

Published on: Sep 08, 2026 04:38 PM

Follow Us