Mumbai Rain | राज्यात 5 जिलह्यात रेड अलर्ट; मुंबईत समुद्रात हायटाईडचा इशारा
दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस होतो आहे. गोरेगाव, अंधेरी, वांद्रे, परळमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. रस्ते आणि रेल्वे वाहतूक अद्याप सुरळीत सुरु आहे. तर मुंबईला पाणीपुरवठा करणारी मिठी नदीही तुडूंब भरुन वाहातेय. मुंबईतही समुद्राला उधाण आलंय.
दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस होतो आहे. गोरेगाव, अंधेरी, वांद्रे, परळमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. रस्ते आणि रेल्वे वाहतूक अद्याप सुरळीत सुरु आहे. तर मुंबईला पाणीपुरवठा करणारी मिठी नदीही तुडूंब भरुन वाहातेय. मुंबईतही समुद्राला उधाण आलंय, तर समुद्राला हायटाईडटा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेध शाळेनं राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अॅलर्ट जारी केला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये कोकणातील दोन आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

