Mumbai ST Bank : एसटी बँकेच्या बैठकीत शर्ट फाटेपर्यंत राडा, ‘त्या’ Video रेकॉर्डिंगवरून हाणामारी
मुंबईतील एसटी बँकेच्या बैठकीत गुणरत्न सदावर्ते गट आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ गटात तुफान हाणामारी झाली. भ्रष्टाचाराच्या आरोप आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून झालेल्या या संघर्षात शर्ट फाडले गेले. हा वाद नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला असून, महिलेवर जातीवाचक टिप्पणी करत मारहाण झाल्याचा आरोप आहे.
मुंबईतील एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुणरत्न सदावर्ते यांचा गट आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या गटात तुफान हाणामारी झाली. बँकेच्या सत्ताधारी संचालकांवर विरोधी संचालकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून ही मारामारी झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही गटांतील संचालकांनी एकमेकांना शर्ट फाटेपर्यंत मारहाण केली. या घटनेनंतर हा वाद नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला आहे.
मारहाणीचा आरोप असलेल्या एका महिलेने सांगितले की, त्यांचा अपमान करण्यात आला, जातीवाचक बोलले गेले आणि त्यांचे कपडे फाडून मंगळसूत्र तोडण्यात आले. हा हल्ला पूर्वनियोजित कट असल्याचा आरोपही पीडितेने केला आहे, तसेच शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याशी याची तुलना केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

