दसरा मेळाव्यानंतर पुढे काय? उद्धव ठाकरेंनी सेनेला पुन्हा उभं करण्याचा प्लॅन सांगितला…
शिवसेनेची पुढची दिशा काय असणार याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलंय. पाहा...
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत पोकळी निर्माण झाली. त्यानंतर ही पोकळी भरली कशी जाणार आणि सेनेची पुढची दिशा काय असणार याबाबत प्रश्न विचारले जातात. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी भाष्य केलंय. त्यांनी पक्षाला बळकट करण्यासाठीचा पुढचा प्लॅन सांगितला आहे. दसरा मेळाव्यानंतर (Dasara Melava )राज्यभर दौरा करणार असल्याचं यांनी सांगितलं आहे. जागोजागी जात लोकांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. यावेळी ते बोलत होते.
Latest Videos
Latest News