पावसाळ्याआधीच मुंबईकरांच्या घशाला कोरड… पाणी जपून वापरा, पाणी कपातीबाबत मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील पाणीसाठा धोकादायक पातळीवर पोहोचल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार असल्याची घोषणा महापालिकेकडून करण्यात आली आहे. ही कपात शुक्रवार, 15 मे 2026 पासून लागू होणार असून, पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होईपर्यंत ती कायम राहणार आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये सध्या केवळ 3 लाख 40 हजार 399 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक गरजेच्या तुलनेत हा साठा फक्त 23.52 टक्के इतकाच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाणी बचतीचे उपाय सुरू केले आहेत.
दरम्यान, राज्यात वाढते तापमान आणि त्यातून वाढणारा बाष्पीभवनाचा वेग यामुळे जलाशयांतील पाणी झपाट्याने कमी होत आहे. याशिवाय, अल निनोच्या प्रभावामुळे आगामी मान्सूनबाबतही अनिश्चितता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. महापालिकेकडून नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याचे आणि अनावश्यक पाणी वाया घालवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Published on: May 12, 2026 10:24 AM
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्