AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MVA Meeting : 'मविआ'च्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, महाविकास आघाडी लागली कामाला

MVA Meeting : ‘मविआ’च्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, महाविकास आघाडी लागली कामाला

| Updated on: Aug 23, 2022 | 10:43 AM
Share

या बैठकीत विधानसभेच्या कामकाजावर रणनीती ठरवण्यात येणार आहे. ही बैठक आज संध्याकाळी 6 वाजता ही बैठक पार पडणार आहे. पालिका निवडणूक, इतर समस्यांवर चर्चा होण्याची सूत्रांची माहिती. वाचा...

मुंबई: आज पहिल्यांदाच महाविकास आघाडीची (maha vikas aghadi) महत्त्वाची बैठक पार पडत आहे. पहिल्यांदा म्हणायचं कारण म्हणजे राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच विधीमंडळात ही बैठक पार पडणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत विधानसभेच्या कामकाजावर रणनीती ठरवण्यात येणार आहे. ही बैठक आज संध्याकाळी 6 वाजता ही बैठक पार पडणार आहे. तर महाविकास आघाडीतील नेते अजित पवार (ajit pawar), जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोले आदी नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहे. पालिका निवडणूक, ओबीसी आरक्षण आणि राज्यातील इतर समस्यांवरही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

Published on: Aug 23, 2022 10:42 AM