AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MVA-MNS Alliance : ...मग निवडणूक का वेगळी लढता? पवार यांचा थेट सवाल, मविआ अन् मनसेची युती होणार?

MVA-MNS Alliance : …मग निवडणूक का वेगळी लढता? पवार यांचा थेट सवाल, मविआ अन् मनसेची युती होणार?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Nov 21, 2025 | 2:47 PM
Share

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. शरद पवार महाविकास आघाडीत मनसेला सामील करण्याबाबत सकारात्मक असल्याचे कळतंय.

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठाकरे बंधूंना (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) एकत्र आणण्यासाठी आणि महाविकास आघाडीत मनसेला सामील करून घेण्यासाठी सकारात्मक आहेत. मुंबई पालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाव्यात, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे. त्यांनी मतदार यादीतील घोळासंदर्भात सर्व पक्ष एकत्र येऊन मोर्चा काढतात, मग निवडणुका स्वतंत्रपणे का लढतात, असा सवालही केल्याचे कळते.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सकारात्मकता दर्शवली तर दुसरीकडे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच पवारांची भेट घेतली होती. मुंबई महापालिका मविआ म्हणून लढली पाहिजे, असे पवारांचे मत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मतदार यादीतील घोळ आणि मतचोरीच्या विरोधात एकत्र मोर्चा काढता, मग निवडणूक वेगळी का लढता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मविआमध्ये मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याबाबतही पवार सकारात्मक असल्याचे कळते.

Published on: Nov 21, 2025 02:47 PM

Follow Us
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय.

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय