My India My Life Goals | गंगा नदीचा काठ स्वच्छ करुन ती प्रदूषणमुक्त करण्यासाठी जनजागृती करणारे राजेश शुक्ला
सर्व भारतीयांनी पर्यावरण स्वच्छ ठेवून निरोगी राष्ट्र निर्माण केले पाहिजे, असे राजेश शुक्ला दररोज लोकांना सांगत जनजागृती करत आहेत.
Green Warriers : व्हिडिओमध्ये स्कूटर चालवत असणारे गृहस्थ आहेत राजेश शुक्ला. ते कोणी प्रसिद्ध व्यक्ती नाही पण ते जे करत आहेत ते प्रसिद्ध लोक देखील करत नाहीत. राजेश शुक्ला हे पहाटे 5 वाजता घरातून निघतात. आपल्या टीम सदस्यांसह दररोज पवित्र गंगा नदीचा किनारा स्वच्छ करतात. ते म्हणतात. सुमारे तीन तास नदीचा किनारा स्वच्छ करणे हा त्यांचा नित्यक्रम बनला आहे. स्वच्छतेच्या कामानंतर नदीत पवित्र स्नान आणि पूजेसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करण्याचे काम केले जाते.
पॉलिथिन प्लास्टिक पिशव्या, कचरा आदी नदीत टाकू नका, ते पर्यावरणाला घातक आहे, अशा घोषणा मायक्रोफोनद्वारे करून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या आपण सर्व भारतीयांनी पर्यावरण स्वच्छ ठेवून निरोगी राष्ट्र निर्माण केले पाहिजे, असे ते दररोज लोकांना सांगत जनजागृती करत आहेत.
Published on: Aug 07, 2023 05:03 PM
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
