Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी ‘ती’ महिला कोण?
बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोग येथील घराबाहेर एक अज्ञात महिला फिरत असल्याचं आढळून आलं आहे. या महिलेने काही मोठे दावे केले आहेत.
बीडच्या मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराजवळ एका अज्ञात महिलेचा वावर दिसून आला आहे. संतोष देशमुख यांचा मारेकरी कृष्णा आंधळेबद्दल आपल्याकडे पुरावे असल्याचं सांगत ही महिला रात्रभर देशमुखांच्या घराजवळ ठाण मांडून बसली होती. मात्र याठिकाणी पोलीस येताच या महिलेने बस मधून पोबारा केला. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला 4 महीने उलटून गेलेले आहेत. मात्र अद्यापही आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्यामुळे ही महिला नेमकी कोण होती? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Published on: Apr 22, 2025 09:01 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

