Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडने मोठी कारवाई करत 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित केले आहेत. बँक गॅरंटी सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडने मोठी कारवाई करत 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित केले आहेत. बँक गॅरंटी सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लासलगाव बाजार समितीत कांदा खरेदीसाठी कार्यरत असलेल्या 18 संस्थांपैकी 12 संस्थांनी आवश्यक बँक गॅरंटी जमा केली नव्हती. त्यामुळे नाफेडने संबंधित संस्थांचे परवाने तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कारवाईचा थेट परिणाम बाजार समितीतील कांदा खरेदी व्यवहारांवर झाला असून, खरेदी प्रक्रियेला मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. खरेदीदार संस्थांची संख्या कमी झाल्याने बाजारात आलेल्या कांद्याच्या विक्रीवर आणि शेतकऱ्यांच्या व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आवश्यक कागदपत्रे आणि बँक गॅरंटीची पूर्तता केल्यानंतर संबंधित संस्थांबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नाफेडच्या या कारवाईमुळे कांदा व्यापार क्षेत्रात खळबळ उडाली असून, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष आता पुढील घडामोडींवर लागले आहे.
Published on: Jun 10, 2026 11:15 AM
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?

