Video : नागपूर मनपाचे कर्मचारी कार्यालयात रमी, पत्ते खेळ, परभणीच्या गंगाखेड नगरपरिषदेत गटारीची पार्टी
नागपूर महानगरपालिकेतला धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पालिकेचे कर्मचारी कार्यालयातील संगणकावर कार्यालयात पत्ते आणि रमी खेळत असल्याचा प्रकार पुढे आलाय.
नागपूर महानगरपालिकेतला धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पालिकेचे कर्मचारी कार्यालयातील संगणकावर कार्यालयात पत्ते आणि रमी खेळत असल्याचा प्रकार पुढे आलाय. कार्यालयात रमी खेळतानाचा व्हिडीओ ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागलाय. शिवसैनिक नितीन सोळंके यांनी मोबाईलवर हा व्हिडीओ शुट केलाय. महानगरपालिकेतल्या सामान्य प्रशासन विभागातला धक्कादायक प्रकार घडलाय. तर दुसरीकडे परभणीच्या गंगाखेड नगर पालिकेच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात गटारीची पार्टी रंगल्याचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय…हॉटेल समजून चक्क नगर परिषद कार्यालयातच गटारी साजरी केल्याचा संतापजनक प्रकार या व्हिडिओ नंतर ऊघडकीस आला आहे… स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात अनेक जण बिर्याणीवर ताव मारतांना यात दिसत आहेत.
नागपूर आणि परभणी जिल्ह्यात घडलेल्या या प्रकाराबद्दल काय कारवाई होणार याकडे लक्षं लागलं आहे.
Latest Videos
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
