Nagpur Violence Video : नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर, पोलिसांकडून मोठा दावा
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंडचे पहिल्यांदा समोर आले असून नागपुरात झालेल्या हिंसाचारामागे फहीम खान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून नागपुरात दोन गटात तुफान हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन राज्यात वादंग सुरू आहे. अशातच महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा थेट इशाराच विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाकडून देण्यात आला. यानंतर नागपुरात दोन गटांमध्ये झालेल्या राड्यादरम्यान जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. मात्र नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या मास्टरमाईंडचे नाव समोर आले आहे. नागपुरातील हिंसाचाराचा मास्टरमाईंड हा फहीम खान असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. फहीम खान याने लोकांना भडकवण्याचे काम केले त्यानंतर नागपुरात हिंसाचार उफाळून आला त्यामुळे नागपुरात झालेल्या हिंसाचारामागे फहीम खान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या तक्रारीमध्ये नागपुरात झालेल्या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या फहीम खान याचं नाव उघड झाले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

