AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरच्या मनिष नगर अंडरपासमध्ये पाणीच पाणी, रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं नागरिक हैराण

नागपूरच्या मनिष नगर अंडरपासमध्ये पाणीच पाणी, रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं नागरिक हैराण

| Updated on: Jul 28, 2023 | 11:14 AM
Share

VIDEO | राज्यातील सततच्या कोसळणाऱ्या पावसानं नागपूरच्या मनिष नगर अंडरपासचं रूपांतर स्विमिंग पूलमध्ये...नागरिकांची गैरसोय

नागपूर , 28 जुलै 2023 | राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः कहर केला आहे. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे नागपुरमध्ये नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे. नागपूरच्या मनिषनगर अंडरपासमध्ये पाणीच पाणी भरल्यानं नागरिकांना ये-जा करणं कठीण होत आहे, त्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. नागपूर मेट्रोचा मनिष नगर हा अंडरपास आहे. या अंडरपासमधून साधारण ४ ते ५ हजार लोकांचा प्रवास हा रोज होत असतो. मात्र होत असलेल्या पावसामुळे या अंडरपासमध्ये ३ ते ४ फूट पाणी भरलं आहे. त्यामुळे येथील नागरिकांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आलाय. तर ठाण्यासह रायगड, पुणे आणि रत्नागिरीली आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई शहरासह आज उपनगराला सकाळी साडे आठ वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला होता मात्र यानंतर आता साडे आठ वाजेनंतर यलो अलर्ट असणार आहे.

Published on: Jul 28, 2023 10:44 AM