परवानगी नसताना शाळा सुरु, नागपूरच्या अम्ब्रेला नर्सरी स्कूलमधील मुलांच्या जीवाशी खेळ

नागपूर महानगरपालिकेच्या तपासणीत 120 चिमुकली शाळेत असल्याचं आढळलं होतं. कामठी रोडवरील कडबी चौकात असलेली अम्ब्रेला नर्सरी स्कूल सुरु होतं. नागपूर महानगरपालिकेने शाळा व्यवस्थापन प्रशासनाला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला

नागपूरमध्ये परवानगी नसतानाही नर्सरी स्कूल सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंब्रेला नर्सरी स्कूलने अक्षरशः लहान मुलांचा जीव धोक्यात घातला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या तपासणीत 120 चिमुकली शाळेत असल्याचं आढळलं होतं. कामठी रोडवरील कडबी चौकात असलेली अम्ब्रेला नर्सरी स्कूल सुरु होतं. नागपूर महानगरपालिकेने शाळा व्यवस्थापन प्रशासनाला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना, त्यातही लहान मुलांवर तिसऱ्या लाटेचं संकट असताना नर्सरी स्कूल सुरु केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI