AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur : बय्यो... एकाच घरात 200 मतदार, नागपूरमधील मतदार यादीतील घोळ उघड, नागरिकानं थेट यादीच दाखवली अन्..

Nagpur : बय्यो… एकाच घरात 200 मतदार, नागपूरमधील मतदार यादीतील घोळ उघड, नागरिकानं थेट यादीच दाखवली अन्..

| Updated on: Oct 13, 2025 | 1:59 PM
Share

नागपूर वानाडोंगरी येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी प्रकाशित झालेल्या मतदार यादीत मोठ्या अनियमितता आढळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. एकाच घर क्रमांकावर अनेक मतदारांची नोंदणी, इतर प्रभागातील नावे आणि चुकीची माहिती यामुळे नागरिक संतप्त झाले असून, त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगरपरिषदेच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप स्थानिक मतदारांनी केला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या या याद्यांमध्ये अनेक गंभीर चुका असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले आहे. प्रभाग पाचमधील रहिवासी विलास भागवत यांच्या मते, घर क्रमांक एकवर तब्बल १९० मतदारांची नोंदणी आहे, परंतु यापैकी अनेक नावे रामकोना, धापेवाडा आणि खापरखेडा यांसारख्या इतर ठिकाणांवरील आहेत. त्यांच्या कुटुंबीयांची नावेही योग्य प्रकारे जुळत नसल्याचा दावा त्यांनी केला.

याशिवाय, खामल्यातून आलेल्या ११ मेघे कुटुंबांची नावे प्रभाग पाचमध्ये चुकीच्या पद्धतीने समाविष्ट केल्याचेही भागवत यांनी म्हटले आहे. प्रभाग तीनमधील चंदन वर्मा यांनी त्यांच्या प्रभागात ३५०० पैकी १५०० मतदार बाहेरचे असल्याचे सांगितले, तर त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाची नावे प्रभाग चारमध्ये गेली आहेत. या सर्व अनियमिततेविरोधात निषेध म्हणून मतदार यादी जाळण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Published on: Oct 13, 2025 01:58 PM