Nana Patole On Devendra Fadnavis | फडणवीसांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांना सल्ला द्यावा - नाना पटोले

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 01, 2022 | 2:10 PM

राष्ट्रीय पातळीवर कॉग्रेसचं शिबिर झाल्यावरती शिर्डीत दोन दिवसाचं शिबिर होतंय त्याबद्ल काय संकल्प असणार आहे.उदयपुर मध्ये जे ठराव झालेले आहे त्यातून संकल्प घेऊन काँग्रेसला पुढे न्यायचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून केल्या जाणार आहे. वेगवेगळ्या विषयांवरती या शिबिरात चर्चा केली जाईल. जेणेकरून काँग्रेसचा नवीन संकल्प त्याची अंमलबजावणी करता येईल. असं यावेळी नाना पटोले म्हणाले. देवेंद्र फडणवीस चेसच्या उद्घाटना गेले होते तेव्हा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. 2019 ला बुद्धीबळात विजयी झालेल्यांना पण पराभुत व्हावं लागलं. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा. असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. याबद्दल काय सांगाल असा प्रश्न आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी नाना पटोले यांना विचारला असता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांना सल्ला द्यावा. महागाई ज्यापद्धतीने वाढलेली आहे हार-जीत तर होतंच राहते. पण महागाई वरती नियंत्रण आणणं हे नरेंद्र मोदींचे काम आहे. असं नाना पटोले यावेळी म्हणाले आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें