पीक विमा कंपन्यांचे सर्व्हर बंद, नुकसानाचे फोटो कसे पाठवायचे, महसूल विभागानं वाऱ्यावर सोडलं, नांदेडचे शेतकरी आक्रमक

नांदेडमध्ये अतिवृष्टीनंतर पीकविमा कंपण्यासह सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी हतबल झालेयत. पिकांचे नुकसान झाल्यास पीकविमा कंपन्यांना फोटो पाठवावे लागतात, मात्र विमा कंपन्यांचे इंटरनेट सर्व्हर बंद पडलंय. त्यामुळे नुकसानीचे फोटो पाठवावे कसे असा सवाल शेतकरी करतायत

नांदेडमध्ये अतिवृष्टीनंतर पीकविमा कंपण्यासह सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी हतबल झालेयत. पिकांचे नुकसान झाल्यास पीकविमा कंपन्यांना फोटो पाठवावे लागतात, मात्र विमा कंपन्यांचे इंटरनेट सर्व्हर बंद पडलंय. त्यामुळे नुकसानीचे फोटो पाठवावे कसे असा सवाल शेतकरी करतायत, तर दुसरीकडे महसूल विभागाने अद्यापही नुकसान झालेल्या शेताकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळेल की नाही अशी शंका शेतकऱ्यांना येतेय. काढणीला आलेलं पीक हाथचे गेल्याने आता आगामी सणासुदीचे दिवस काढावेत कसे असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय. नांदेडमध्ये अतिवृष्टीनंतर वाऱ्यावर सोडल्याची भावना शेतकऱ्यांत निर्माण झालीय. अतिवृष्टी होऊन चार दिवस उलटले तरी अद्याप कुणीही बांधावर फिरकलेले नाही. त्यामुळे योग्य ती नुकसान भरपाई मिळेल की नाही अशी शंका शेतकऱ्यांना येतेय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI