महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला अन्… नांदेडमध्ये दुदैवी घटना, नेमकं काय घडलं?
नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
नांदेड जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची दुदैवी घटना घडली. तर यामुळे तब्बल 8 महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. नांदेडचे आलेगाव येथे ट्रॅक्टरमधून महिला मजूर जात होत्या मात्र हा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या अपघातातून आठ महिलांचा मृत्यू झाल्याची सांगितले जात आहे. यानंतर या मजूर महिलांना वाचवण्यासाठी बचाव कार्य प्रगतीपथावर सुरू आहे. विहिरीत पडलेल्या मजूर महिलांना चार कृषी पंपाच्या सहाय्याने बाहेर काढण्यास शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. सकाळी घटना घडल्यानंतर आठ वाजल्यापासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने हे बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तर विहिरीत पाणी असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दोन मजूर महिलांना वाचवण्यात यश आले असून ट्रॅक्टर मधील इतर महिला मुलींसह आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या सर्व महिला हिंगोलीतील वसमत तालुक्यातील भुज गावात राहणाऱ्या असल्याची माहिती मिळत आहे.
Published on: Apr 04, 2025 12:20 PM
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
मुंबईत पावसाचा कहर! बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याबाहेर पाणीच
Subway नाही, खळखळ वाहती नदीच! अंधेरी सबवे'तील धक्कादायक दृश्य, पहा
