आधी तोडफोड, मग जाळपोळ! आदिवासींच्या आंदोलनाला आक्रमक रूप
नंदुरबारमध्ये आदिवासी मोर्चादरम्यान हिंसक घटना घडली. एक तरुणाच्या मृत्यु्यानंतर सुरू झालेल्या आंदोलनात आक्रमक आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी अश्रूगॅसचा वापर करून जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
नंदुरबार शहरात आदिवासी मोर्चादरम्यान हिंसक घटना घडली. एक तरुणाच्या मृत्युने संतप्त झालेल्या आदिवासी संघटनांनी आंदोलन केले. या आंदोलनात आक्रमक झालेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. काही वाहने जाळण्यात आल्याच्याही बातम्या आहेत. पोलिसांनी अश्रूगॅसचा वापर करून जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेत अनेक पोलिस आणि राज्य राफिदलाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेबाबत तपास सुरू केला आहे.
Published on: Sep 24, 2025 04:22 PM
Latest Videos
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

