Nandurbar | नवापूरच्या विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आणि गोडाऊनला भीषण आग

नवापूर येथील विजय इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाला आणि गोडाऊनला भीषण आग लागलीय. आग नेमकी कशामुळं लागली याचं कारण गुलदस्त्यात आहे.  

नंदुरबार: नवापूर येथील विजय इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाला आणि गोडाऊनला भीषण आग लागलीय. आग नेमकी कशामुळं लागली याचं कारण गुलदस्त्यात आहे.
नवापूर ,नंदुरबार, सोनगड अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आगीत नेमकं किती नुकसान झालंय याची माहिती मिळालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असून  परिसरात कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आग विझवणयासाठी गेलेला अग्निशामक दलाचा एक जवान जखमी झाल्याची माहिती आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI