AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | Disha Salian प्रकरणी Narayan Rane दाव्यांवर ठाम

Special Report | Disha Salian प्रकरणी Narayan Rane दाव्यांवर ठाम

| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 9:02 PM
Share

दिशा सालियान (Disha Salian) मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी गंभीर आरोप केले आहेत. याच प्रकरणात मालवणी पोलिसांकडून नारायण राणे आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची आज मालवणी पोलिसांकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली.

दिशा सालियान (Disha Salian) मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी गंभीर आरोप केले आहेत. याच प्रकरणात मालवणी पोलिसांकडून नारायण राणे आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची आज मालवणी पोलिसांकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. जबाब नोंदवल्यानंतर नारायण राणे पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. त्यावेळी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. इतकंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्यानंतर माझा जबाब नोंदवला गेला आणि मग आम्हाला सोडण्यात आल्याचं राणेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. ‘मला दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यातून एक नोटीस आली होती. आपण आपलं म्हणणं सांगण्यासाठी पोलीस ठाण्यात यावं अशी ती नोटीस होती. त्यात दिशा सालियानच्या आईने तक्रार केल्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणणं सांगायला बोलावण्यात आलं आहे. दिशाबाबत जे काही मी आणि नितेश पत्रकार परिषदेत बोललो होतो. तिचे खरे आरोपी पकडले पाहिजेत. तिने आत्महत्या केली नसून ती हत्या आहे, असं मी वारंवार बोलत होतो. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या दिशाच्या आईकडे गेल्या. त्यांना तक्रार करण्यासाठी प्रवृत्त केलं. आईला खोटी तक्रार करायला लावली’, असा गंभीर आरोप राणेंनी केलाय.

Published on: Mar 06, 2022 09:02 PM