Sushant Singh Rajput Case: सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
Narayan Rane On Sushant Singh Case : सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, याबद्दल अद्यापही वादंग सुरू आहे. आज नारायण राणे यांनी याबद्दल बोलताना सुशांतचा खून होताना नोकराने पाहिलं होतं. त्याने ते सर्व रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये केलं असल्याचा दावा केला आहे.
दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची हत्या होताना त्याच्या नोकराने मोबाईलमध्ये शूटिंग केलं होतं, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. वेळ आल्यावर यांच्याकडचे पुरावे पोलिसांना देऊ असंही राणे यांनी यावेळी म्हंटलं आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूवरून नारायण राणे यांनी हा मोठा दावा केला आहे. यावेळी बोलताना राणे म्हणाले की, सुशांतचा खून हा त्याच्या नोकरा समोर झाला आहे. मग पोलिसांनी त्या नोकराचा जबाब का नाही नोंदवला? मूळचा सिंदूदुर्गचा असलेला हा सुशांतचा नोकर सध्या खेरवाडीमध्ये राहतो. या नोकराने त्याच्या मोबाईलमध्ये सर्व घटना कैद केलेली आहे, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
Published on: Mar 23, 2025 10:42 AM
Follow Us
Latest Videos
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं