Narayan Rane : मुंबईतून मराठी माणूस बाहेर गेला, जबाबदार कोण? नारायण राणेंचा घणाघात
Narayan Rane Slams Shivsena UBT : खासदार नारायण राणे यांनी हिंदी-मराठीच्या वादावरून ठाकरेंवर टीका केली आहे.
मराठी माणूस यांना आत्ता आठवत आहे. याआधी मराठी माणसासाठी यांनी काय केलं? मुंबईतून मराठी माणूस बाहेर जाण्याला कारणीभूत कोण आहे? असा घणाघाती प्रश्न खासदार नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. शिवसेना उबाठा गटावर त्यांनी ही टीका केली आहे.
यावेळी बोलताना राणे म्हणाले की, 1960मध्ये मुंबईत 60 टक्के लोक मराठी होते. आता फक्त 18 टक्के मराठी लोक उरलेले आहेत. याला जबाबदार कोण आहे? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना असं तुम्ही म्हणतात, मग गेली कुठे मराठी माणसं? असा सवाल देखील नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते फक्त 2 दिवस मंत्रालयात आले, असा आरोप देखील यावेळी राणेंनी केला आहे. त्यांना मुख्यमंत्रिपदाचंच महत्व नाही, असंही खोचक टीका यावेळी त्यांनी केली.