दूरसंचार कंपनींसंबंधी मोदींच्या अध्यक्षतेत बैठक, वोडाफोन-आयडियावर महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत दूरसंचार क्षेत्रासाठी मदत पॅकेजला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकते.

कोरोना संकटाच्या काळात फटका बसलेल्या दूरसंचार क्षेत्राला आज म्हणजे बुधवारी, मोदी सरकार मदत पॅकेज जाहीर करु शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत दूरसंचार क्षेत्रासाठी मदत पॅकेजला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकते. या पॅकेजमध्ये कर भरण्यात कपात देखील समाविष्ट असू शकते. टेलिकॉम क्षेत्राला स्पेक्ट्रमसाठी हप्ते भरण्यात एक वर्षाची स्थगिती देण्याची सुविधा दिली जाऊ शकते. टेलिकॉम कंपन्यांना एप्रिल 2022 पर्यंत स्पेक्ट्रम फी भरायची आहे. केंद्र सरकारने यासाठी टेलिकॉम कंपन्यांशी सातत्याने बातचित केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI